न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- दारु पिऊन विनाकारण फिर्यादीचे पती हे फिर्यादीस शिवीगाळ करुन मारहाण करतात. आरोपी पतीने फिर्यादी व त्यांच्या आईला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेवून त्यांचा अपमान करुन शारीरीक व मानसीक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना सन २०१६ पासुन आतापर्यंत १२/१४ राजवाडा, दत्त मंदीराच्या पाठीमागे, सेक्टर २, इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.
२७ वर्षीय महीला फिर्यादी यांनी आरोपी पती अनोज लक्ष्मण साळवे (इंद्रायणीनगर, भोसरी) याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.


















