न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२२) :- घरी फिर्यादी महिला एकट्या झोपल्या होत्या. दरम्यान (दि. ५) दुपारी ३.३० वा. सुमारास फिर्यादीच्या घरी येऊन आरोपी हा फिर्यादीच्या बेडवर झोपला. फिर्यादी उठल्या त्यावेळी आरोपीने फिर्यादीस मिठी मारली व अश्लील कृत्य केले. त्यामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.
फिर्यादीने आरोपीला ढकलून दिले. ” मी तुझ्यासाठी आलो आहे ” असे म्हणत आरोपीने पुन्हा फिर्यादीजवळ येऊन त्यांचा हात धरुन त्यांचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. २८ वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी मनिष बोराडे (रा. काटेपुरम चौक, सांगवी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
















