न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२२) :- वल्लभनगर बस स्टॉपमध्ये ६ किलो २५ ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी (दि. ५) रोजी दुपारी ३.३० वाजत बस स्टॉपमध्ये कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले.
लखन उर्फ गोविंद तात्या काळे (वय २८ वर्षे, रा. मुरुड, ता. जि. लातुर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १,५६,२५० रुपये किंमतीचा गांजा आणि १५,००० रुपये किंमतीचा मोबाईल व १३० रुपये रोख असा एकूण १,७१,२८० रुपये किंमतीचा माल पोलिसांनी जप्त केला.
त्याने हा गांजा सह आरोपी २ सुनिल बाबु काळे (रा. मौजे कळम, शिवाजी चौक, पाण्याचे टाकीजवळ, कळम, जि उस्मानाबाद) याच्याकडुन आणला असल्याचे तपासात सांगितले.
















