न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२२) :- कासारवाडी, गहुंजे आणि हिंजवडी परिसरात रिक्षा, मोबाईल, आणि लॅपटॉप चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्याप्रकरणी शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिव्हीएस कंपनीची, किंग मॉडेल काळ्या पिवळ्या रंगाची ६०,००० रूपये किंमतीची तिन चाकी (एम एच १४ जीसी ३४७२) रिक्षा, फिर्यादीने लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरटयाने दि. ३१/१२/२०२२ सायंकाळी ४. ०० वा ते दि.०१/०१/२०२३ रोजी सकाळी ९.०० वा. च्या दरम्यान फिर्यादीच्या घरासमोर, विष्णु लांडगे चाळ, घरमालक दत्तात्रय लांडगे यांच्या रूमसमोर, जैन मंदिरा जवळ, कासारवाडी येथून चोरून नेली आहे. फिर्यादी
हुसेन बाजा पटेल (४२ वर्षे, रिक्षाचालक, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोबाईल फोनवर बोलत असताना विप्रो सर्कल रोडकडुन काळया रंगाची स्पेल्डर दुचाकीवरुन दोन अनोळखी इसम फिर्यादीजवळ आले. त्यांनी ५०,००० रु. कि. चा निळया रंगाचा अॅपल कंपनीचा आयफोन १४ प्लस जबरदस्तीने हिसकावुन चोरी करून नेला. ही घटना (दि. ६) रोजी रात्री ००.१५ वा. चे सुमारास टल्ली बॉय हॉटेल समोरील रोडवर, फेज २, हिंजवडी येथे घडला. फिर्यादी ध्रुव हसमुखलाल अखाणी (वय ३४ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. इबिस हॉटेल, रुम नंबर ११२, फेज २, हिंजवडी) यांनी आरोपी दोन अनोळखी इसमां विरोधात हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
HP कंपनीचा ३०,००० रुपये किंमतीचा लॅपटॉप, १५ (आय फाईव्ह) मोडेल, सिल्वर रंगाचा, त्याचा सिरीयल नंबर ५CD२०२२०७०, असेट आय डी नं. Wo०१.९११०००८०९२९४ हा अज्ञात इसमाने (दि. ५) रोजी सायंकाळी ५.०० ते रात्री ११.०० वा चे दरम्याण जगदंबा पार्किंग, गहुंजे स्टेडीयम, गहुंजे येथून चोरुन नेला आहे. २४ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















