- सदनिका न देता ग्राहकांची दोन कोटींपेक्षा अधिकची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२२) :- फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली पैसे घेऊन अॅग्रीमेंट करुन देखील फिर्यादीसह इतरांना सदनिकेचा ताबा दिला नाही. बांधकाम पुर्ण करून न देता फिर्यादीच्या पैशांचा स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता वापर केला आहे. रकमेबाबत विचारणा केली असता आरोपी बिल्डर धमकीची भाषा करीत आहे.
आरोपी कस्तुरी डेव्हलपर्सचे तुषार सत्यविजय हेडा (वय ४२ वर्षे, रा सुखवाणी रेसीडेन्सी, दापोडी), मॅनेजर राहुल माने (रा ए/ २ / ३४ सुर्यनगरी, पिंपळे गुरव, सांगवी), महीला आरोपी यांनी कस्तुरी प्रिमियम या चव्हाणनगर, गाथा मंदिराजवळ, सर्व्हे नं ४३/५, देहुगाव येथे १ बीएचके फलॅट, नं ३०२, बी विंगमध्ये बुकींगच्या नावाने फिर्यादी कडुन मार्च २०१८ ते आज पर्यंत एकुण १०,४२,७५१ रुपये चेकने व एनइएफटी व्दारे घेतले.
फिर्यादीसोबतच आणखी वीस ग्राहकांनी देखील एक / दोन बीएचके फलॅट बुकींग करुन खरेदीकरीता प्रत्येकाने एकुण २,१६,७४,२११ एवढी रक्कम आरोपींना दिली. आरोपींनी फिर्यादीसह इतरांची तब्बल २,२७,१६,९६२ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी राजेंद्र शशीधर उमदी (वय २९ वर्षे, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ, पुणे) यांनी आरोपी तिघांविरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















