न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२२) :- दोन दुचाकीवरून आलेल्या ४ अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीजवळ येवुन संगणमत करीत त्यांच्यापैकी एका ३५-४० वयाच्या व्यक्तीने सोबत आणलेल्या लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण केली.
उजवे गुडघ्याजवळ मारुन दुखापत केली. उर्वरीत तिघांनी फिर्यादीच्या अंगाशी झोंबाझोंबी करुन फिर्यादीच्या पँटच्या उजव्या खिशातील अंदाजे ५,००० रुपये जबरदस्तीने काढुन घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ६) रोजी १०.३० वा. चे सुमा. वाघुसाने चौक ते झेंडा चौक, साने चौक, चिखली दरम्यानचा रोड गणेश ट्रेडिंग कंपनीजवळ घडली. फिर्यादी विष्णु धोंडिराम बिराजदार (वय ३२ वर्ष, धंदा-व्यवसाय, रा. भावेश्वर हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) यांनी आरोपी चार अनोळखी इसमांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















