न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२२) :- श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक कुमार संगकारा यांची पुणे येथे झालेल्या भारत श्रीलंका एक दिवसीय सामन्यादरम्यान प्रकृती खराब झाली होती. त्यांना संध्याकाळी ८ वाजता हिंजवडी येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले हाेते.
संघकारा यांना थंडी वाजून येणे, डोकेदुखी, आतड्यांमध्ये दाह आणि ताप आला हाेता. तसेच त्यांच्या अंगातील पाण्याचे प्रमाणही कमी झालेले हाेते. ताप तर १०३ डिग्री सेल्सिअस होता.
त्यांच्यावर उपचार करणारे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. श्रीधर देशमुख म्हणाले, आम्ही संघकारांना दवाखान्यात दाखल करून घेतले आणि त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण पुर्ववत केले. साेबत इतर सहाय्यक उपचार दिले गेले आणि ते विषाणूजन्य डिहायड्रेशन आजारातून लवकर बरे झाले. त्यांना गुरूवारी सामन्यांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला. पुढील सामन्यात समालोचकाची भूमिका पार पाडण्यासाठी ते राजकोट येथे रवाना झाले आहेत.


















