न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२२) :- अनोळखी मो. नं. वरून फिर्यादीला फोन आला. परंतु, फिर्यादीनी तो उचलला नाही. नंतर फिर्यादींनी त्यावर फोन केला असता, ” मै एक फौजी हूँ, अभी मै देवळाली कॅम्प, नाशिक इधर डयुटी कर रहा हूँ, मेरी पोस्टींग की बजेसे मेरी अॅक्टीव्हा गाडी (एम.एच १२ क्यु के ८६१९) यह बेचेना का है, मेरा नाम शिपाई अजय मगर ” असे म्हणत गाडीचे फोटो तसेच तो फौजी असल्याचे फोटो व त्याचे कॅन्टीन आयकार्ड तसेच त्याचे आधारकार्ड असे पाठवून तो फौजी आहे, अशी बतावणी केली.
तसेच त्याचा एंजट विलास सोडक याचा मो. नं. ८९१७६७९७२५ याने गाडी आर्मी पोस्टाने येईल असे सांगितले. फिर्यादीस फोन पे वर पैसे पाठविण्यास सांगितले. एकूण ४२,५५० रूपये स्वीकारून सुध्दा गाडी पाठविली नाही. दोन्ही आरोपींनी त्यांची ओळख लपवून फिर्यादीची ऑनलाईन फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १७) रोजी काटे कॉलनी नं. ०५, संस्कार रेसिडेन्सी, फ्लॅट नं. १०४, चोविसावाडी, आळंदी देवाची येथे ऑनलाईनद्वारे घडली. फिर्यादी विलास धोंडू चव्हाण (वय ५४ वर्षे, व्यवसाय रिटायर्ड, रा. काटे कॉलनी नं. ०५, चोविसावाडी, आळंदी देवाची) यांनी आरोपी अजय मगर, विलास सोडक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















