न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२२) :- आजची पत्रकारिता ही जलद आणि गतिमान झाली आहे. सोशल मीडियाने जग पादाक्रांत केले आहे. आगामी काळ हा डिजिटल वृत्तपत्रांचा राहणार आहे. त्यामुळे येणारी नवी आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांनी सजग व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी केले.
भारतीय पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती, पत्रकार दिनाचे औचित्य साधून शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वतीने शहरातील विविध वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
नखाते यांच्या काळेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, डी. एम. कोळी, गोरख पाटील निलंगेकर, नरसिंग माने, सुभाष लोंढे, एकनाथ काटे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पद्माकर जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पुढारी वृत्तपत्राचे वितरण व्यवस्थापक विजय जाधव, रोखठोक न्यूजचे गणेश हुंबे, दै. पुण्यनगरीचे भूषण नांदूरकर, दै. सकाळचे रवी जगधने, न्यूज पीसीएमसीचे संतोष जराड, तसेच मंगेश सोनटक्के, लीना माने, दीपक साबळे, महावीर जाधव, संतोष गोटावळे या पत्रकारांचा सत्कार यावेळी करण्यात आला.


















