न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२२) :- टाटा कंपनीचा ट्रेलर (एन एल ०१ के ७७०१) हा (दि. ३१/१२/२०२२) रोजी दुपारी ३ ते रात्री ११.०० च्या दरम्यान सोमाटणे, लडकत पेट्रोल पंप, मावळ येथून आरोपींनी संगनमताने चोरून घेऊन नेला आहे. त्याची किमत ४,००,००० रुपये आहे.
फिर्यादी जसबिरसिंग राजेन्द्रसिंह विलखु (वय ३५ वर्षे धंदा ट्रान्स्पोर्ट व्यवसाय रा.ए. विंग ४०३ सेक्टर ११ प्लॉट नं २२, गुरदवाराजवळ, इव्हि होमस, कळंबोळी, नवी मुंबई) यांनी आरोपी गुरशरनजितसिंग गज्जनसिंग सोहल (रा. कळंबोळी, नवी मुंबई), गुरप्रितसिंग जसविंदर चढाव (रा. सेक्टर ३ फलॅट नं ४ कळंबोळी, नवी मुंबई) यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
















