न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२२) :- भोसरी एमआयडीसी परिसरात जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने शनिवारी दंडात्मक कारवाई केली.
भोसरी, एमआयडीसी एफ दोन ब्लॉक येथे उघड्यावर कचरा टाकण्यात आला होता. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ५० हजार रुपये दंड वसूल केला आहे.
‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी आण्णा बोदडे, सहा. आरोग्यधिकारी तानाजी दाते यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उज्जीनवालं , आरोग्य निरीक्षक संजय मानमोडे, आरोग्य निरीक्षक क्षितिज रोकडे, आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे यांनी एकत्रित ही कारवाई केली.


















