न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२२) :- वडगाव मावळ येथील कान्हे गावानजीक असणाऱ्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या स्पेअर बिझनेस युनिट प्लान्टमध्ये शनिवारी रात्री बिबट्या आढळला आहे.
सीसीटीव्हीमुळे ही घटना उजेडात आली. वनखात्याला याबाबतची माहिती देण्यात आली असून अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाले होते. परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्याची तयारी सुरु आहे.















