न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जानेवारी २०२२) :- पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षाकरीता आरोपीला तडीपार केले असतानादेखील तो शहरात आला. त्याने हातामध्ये १०० रुपये किंमतीची एक लोखंडी तलवार बाळगली होती.
भोसरी पोलिसांनी (दि. ८) सायंकाळी ५.४५ वा. चे सुमा. गुलाबनगर, रेल्वे लाईनजवळ, दापोडी येथील आरोपीच्या राहत्या घराच्या पाठीमागील गल्लीतून आरोपीला ताब्यात घेतले.
इम्तीयाज ऊर्फ ताजइस्लाम शेख (वय ३० वर्षे, रा. गुलाबनगर, रेल्वे लाईन जवळ, दापोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.















