न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ जानेवारी २०२२) :- ओ.एल.एक्स साईटवर (एम.एच.१२ पी.एच.५५५४) ही मारुती कंपनीची ब्रिझा गाडी विक्रीसाठी आहे, अशी जाहीरात आरोपीने टाकली. गाडी जुनी सांगवी, शितोळे नगर येथे प्रत्यक्ष दाखविली. गाडीचा व्यवहार ६,७०,००० रुपयांना ठरला. गाडीच्या विक्रीपोटी फिर्यादीकडुन आरोपीने ऑनलाईन स्वरुपात ४,५०,००० रुपये स्विकारले.
उर्वरित २,२०,००० रुपये फिर्यादी देत असतानाही आरोपीने फिर्यादीस गाडी दिली नाही. फिर्यादीने वारंवार फोन करुनही फोन उचलने बंद केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी कुणाल वसंत ब-हाटे (वय ३२ वर्षे रा. के/ ऑफ अक्षय चोपडे, सिध्दविनाय बिल्डींग, शिवाजी पार्क गल्ली नं ३, साई चौक नवी सांगवी) यांनी आरोपी सनी सुनिल दाते (रा. फ्लॅट नं ६२४, मृष्णाल क्लासीक, विदया व्हॅली रोड, सुसगाव) याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.















