न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) चिंचवडगाव येथील बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन केबिनचे उद्घाटन पीएमपीएमएल मुख्यालय क्र. २ चे प्रमुख सुनिल दिवाण यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले.
चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, मुकेश चुडासमा, ज्येष्ठ नागरिक संघाचे बबन चव्हाण, माळवदकर, पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापकीय अध्यक्ष ओमप्रकाश बकेरीया, शिवरत्न बाणे, स्थानक प्रमुख बाळासाहेब ढोले, निवृत्त कर्मचारी चंदू वाले, प्रवासी सज्जू जगताप समवेत विविध डेपोच्या प्रमुखांच्या उपस्थितीत केबिनचे पुजन करून उद्घाटन केले.
सुनिल दिवाण म्हणाले, चिंचवडगाव येथील बस स्थानकातून विविध मार्गावर बसेस धावतात. प्रवाशांना विविध मार्गावर धावणार्या बसगाड्यासंदर्भात अचूक माहिती आता नव्याने सुरु होत असलेल्या चौकशी कक्ष केबिन मधून स्थानक प्रमुख, कर्मचार्यांकडून दिली जाईल. पीएमपीएमएल तुमची आमची सर्वांची आहे. भविष्यात बहरत राहो, प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहून त्याचा प्रवास वेळेत व सुखकर कसा करता येईल, यासाठी प्रयत्नशील राहू.
चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात प्रयत्न करू असे आश्वासन देवून येत्या जास्तीत-जास्त गाड्या सोडून प्रवाशांची सोय केले जाईल. आमच्या चालक, वाहक कर्मचार्यांच्या गणवेशावर प्रवाशांची निष्ठा आहे.
चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी पीएमपीएमएल ने उपलब्ध केलेल्या प्रवासी सुविधाबद्दल आभार व्यक्त करून या बसस्थानकात सकाळ पासून रात्रीपर्यंत शाळा, कॉलेजला जाणारे मुले-मुली, महिला कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, पुण्याहून बाहेरगावी इच्छुकस्थळी जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात. तसेच, अनेक ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना बसची वाट पाहण्यासाठी ताटकळत थांबावे लागते, त्यावेळी तसेच, थंडी व पावसाच्या प्रसंगात स्त्री व पुरुषांसाठी बसस्थानकातच सुलभ शौचालय नसल्यामुळे गैरसोय होते. येथे शौचायल असणे गरजेचे आहे. तसेच, गाड्याचे वेळापत्रक आदी सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, अशी मागणी केली.
चिंचवडगावातील स्थानक प्रमुख बाळासाहेब ढोले म्हणाले, या स्थानकातून मनपा, कोथरूड, कात्रज, हडपसर, वारजे माळवाडी, भोसरी, वाल्हेकरवाडी, हिंजवडी भागात दोन पाळ्यात सुमारे १५० पीएमपीएमएल च्या बसेस धावतात. प्रवासी अडचणी सोडविण्यासाठी मागणी केलेल्या केबिनची पूर्तता मुख्यालय क्र. २ चे प्रमुख सुनिल दिवाण यांनी केले. त्याबद्दल विशेष आभार मानले.


















