- पुन्हा मागितलेले पैसे न दिल्याने ठेकेदारावर कोयत्याने हल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- कामावरुन कमी केले व पैसे दिले नाही. याचा राग मनात धरुन आरोपीने फिर्यादीच्या घरातील महिलांचे अश्विल फोटो व व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली. त्यासाठी फिर्यादीकडून ५ लाख रुपयांची खडणी घेतली. तसेच आणखी २५ लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादीने ती रक्कम देण्यास आरोपींना नकार दिला. त्यामुळे आरोपींनी फिर्यादील जीवे ठार मारण्याची धमकी दिली. इतर सहआरोपी यांनी फिर्यादीची गाडी अडवुन फिर्यादीवर लोखंडी कोयत्याने हल्ला केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ०२/१२/२०२२) रोजी ते आजतागायत लक्ष्मी चौक, हिंजवडी आणि भोसरी पी.एम.टी. ऑफिससमोर घडली.
फिर्यादी श्रीराज अनिल सांळुखे (वय ३४, धंदा गव्हेंमेंट कॉन्ट्रॉक्टर, रा. आर/०२, बंगला नं ६८, लाईफ रिपब्लिक, ७ मांरुजी) यांनी आरोपी अशोक सांगळे, रुद्र चाटे व त्यांचे इतर पाच साथीदार यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















