न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- एटीएममधून पैसे काढून बाहेर येत असताना अनोळखी आरोपीने फिर्यादीचे एटीएम कार्ड हात चलाखीने काढून घेतले.
त्याव्दारे फिर्यादीच्या बँक अकाऊंटमधून एका ट्रॅन्झॅक्शनव्दारे व ५ वेळा विड्रॉलव्दारे एकूण १,९७,५०० रूपयांची रक्कम काढून घेतली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि १०) रोजी सकाळी ११.०० वा. ते दुपारी ४.०० वा. चे दरम्यान फ्रेशको डेअरी, कॉलनी नं. ४, पिंपरीगाव येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी अज्ञात व्यक्ती विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















