न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- ‘पैसे कधी देतो’ असे म्हणत फिर्यादीचे नातेवाईक आरोपींनी बेकायदेशीरपणे एकत्र येवुन फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यांनतर आरोपी सागर चव्हाण याने ‘ चल तु गाडीत बस, आपण सानपाडा, मुंबई येथे पोलीस स्टेशनला जावु, तेथे मला तु कधी पैसे देणार, याबाबत लिहुन दे’ असे फसवुन आरोपीसोबत असलेला बांऊसर यांनी फिर्यादीची कॉलर धरून फिर्यादीला ओढत पांढ-या स्कॉर्पियो गाडी (नंबर माहित नाही) मध्ये बसवले. मुंबईकडे जात असताना सागर चव्हाण व त्याच्या सोबतच्या इतर चार साथिदारासह आरोपी २ ते ५ यांनी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच सागर चव्हाण याने ‘ तुला आता गोडाऊनमध्ये नेऊन टाकतो, तुझी आता सुरवात आहे, तु लवकर माझे पैसे दे, नाही तर तुला व तुझ्या मुलाला पोलीस केस मध्ये अडकवतो’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि ९) रोजी रात्री ११.३० वा. चे सुमारास ओम इंटर प्रायजेस कंपनीसमोर, शांतीनगर, भोसरी येथे घडली.
फिर्यादी बिष्माचार्य पांडुरंग मोरे (वय ४४ वर्षे, धंदा-गॅस वितरण, रा. अलकांर हौसा. सोसायटी, डी १५, प्लॅट नं. ४०१, स्पाईन रोड, चिखली घरकुल) यांनी आरोपी सागर बबन चव्हाण (वय ३५ वर्षे), अनिकेत उत्तम सरवडे (वय २१ वर्षे), संकेत मंजाभाऊ ओटी (वय २६ वर्षे), राजु शिवाजी राठोड (वय २६ वर्षे) तसेच स्कॉर्पियो चालक, श्रमीक सिध्दार्थ तांबे (वय २२ वर्षे, रा. सर्वजण मुंबई, पुणे) यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















