न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- मावळ तालुक्यातील चांदखेड येथे यात्रा असल्याने तालुक्यातून अनेक नागरिक यात्रेसाठी आले होते. चांदखेड परिसर गर्दीने गजबजून गेला होता. याच गर्दीचा फायदा आणि गावात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने दारूच्या नशेत असलेल्या अविनाश गोठेने गर्दीत पिस्तुल काढून हवेत गोळीबार केला.
सुदैवाने हवेत गोळीबार केल्याने कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेचा सीसीटीव्ही आणि मोबाईलमध्ये कैद केलेला व्हिडिओ समोर आला आहे.
शिरगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ आणि सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांनी अवघ्या काही तासात या प्रकरणी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.















