न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२२) :- एनजीओ आधार फाउंडेशन आणि पिंपळे सौदागर येथील डॉ. निलेश चाकणे आय आणि चिल्ड्रन हॉस्पिटलच्या वतीने काळेवाडीतील ज्योतिबानगरमध्ये मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन सुनील जयराम आहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात ८२ महिला, पुरुष व मुलांचे डोळे तपासून त्यांना नंबर्स आणि मोफत आय ड्राॕप्स दिले. तसेच मोफत अथवा अति अल्पदरात शस्त्रक्रिया उपलब्ध करुन देण्यात आली.
प्रमोद मोरे यांनी प्रास्तविक करताना आधार फाउंडेशनच्या कार्याचा व भविष्यातील विविध प्रकल्प, कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी संस्थेचे सहसचिव तुषार आहिरे, मुख्य समन्वयक प्रमोद मोरे, संदिप शेटे, रोहित आहिरे, सदस्य दत्तात्रय यादव, मल्हारी पवार, संदिप पाटेकर, अमित राजगुडे, विकास डिंबळे, बाळू कसबे, देवीदास सुर्यवशी, अनंत भोसले, सलीम शेख, अनिस मारुफ, राजेश यादव, अनिकेत व अभिषेक आहिरे, रोहिणी आहिरे, कल्पना आहिरे, सुजाता मोरे, सुषमा कोर्हाळे, शितल राजगूडे आदींनी सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॕ. निलेश चाकणे, डाॕ. पुणीत सिंग, रजीया पठान, फारुक पठान, वसीम अत्तार यांनी सहकार्य केले.















