न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची बुधवारी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
राज्याचे सरचिटणीस आरिफ शेख, सरचिटणीस नितीन खानविलकर (टेम्पो युनिट), सरचिटणीस हेमंत पाटील (कॅब युनिट) आणि मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली या पद नियुक्त्या करण्यात आल्या.
मावळ लोकसभा रिक्षा युनिटच्या उपाध्यक्षपदी सुशांत साळवी, जिल्हा संघटकपदी नितीन सुर्यवंशी, शहर संघटकपदी पांडुरंग जगताप, चिटणीसपदी कृष्ण महाजन यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच टेम्पो युनिटच्या मावळ लोकसभा उपाध्यक्षपदी गोरक्ष मदने, शहर संघटकपदी युवराज जाधव, चिटणीसपदी तानाजी चोर्मले, प्रशांत खवले यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.















