न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- तरुणाने लोखंडी गावठी बनावटीचे एक पिस्टल व एक जिवंत राऊंड जवळ बाळगले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
निगडी पोलिसांनी (दि. ११) रोजी सायंकाळी ५.२० वा. चे सुमारास आकुर्डीतील गणेश टि एन्ड स्नॅक्स सेंटरसमोर, गणेश तलावाजवळ कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले.
इम्तीयाज ऊर्फ इमरान रज्जाक मुल्ला (वय २४ वर्षे, रा. चव्हाण कॉर्नर, विलासराव पाटील पेट्रोल पंपाशेजारी, इस्लामपुर, ता. कळवा, जि. सांगली, सध्या रा. बुधवार पेठ, गल्ली नं. ३, कराड, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून २५६०० रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.















