न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- अनोळखी रिक्षा चालक व त्याचा अनोळखी साथीदार हे फिर्यादी हे ज्या रिक्षातुन जात होते, त्या रिक्षाचालकाने फिर्यादीला रिक्षातुन खाली उतरवले. त्यांच्या जवळील बॅग जबदस्तीने ओढुन घेवुन त्यामधील रोख रक्कम १०,७०० रुपये काढुन घेवुन चोरुन नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १०) रोजी २.०० वा चे सुमारास स्वामी विवेकानंद भुयारी मार्ग, शरदनगर, चिखली येथे घडली. फिर्यादी दिगंबर नागनाथ क्षिरसागर (वय ३८ वर्ष, धंदा नोकरी, रा. चिंचेचा मळा, म्हेत्रेवस्ती, चिखली) यांनी आरोपी अनोळखी दोन इसमांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसानी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.