- ” एजंट, ब्लॅकमेलर व त्रयस्थ व्यक्तींच्या तक्रारींची दखल घेऊ नये; शिक्षण उपसंचालकांचे आदेश.”
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- शासन निर्णय व कायद्यानुसार ज्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे त्यांच्याकडूनच तक्रार अर्ज स्वीकारण्यात यावेत, त्रयस्थ एजंटाकडून किंवा संस्थेमार्फत प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेण्यात येऊ नये, अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील शाळांशी कसलाही संबंध नसताना केवळ ब्लॅकमेलिंग व सूड भावनेच्या उद्देशाने सबंधित इसम शाळांच्या व शिक्षकांच्या तक्रारी करत होते. या प्रकरणी पिंपरी चिंचवड शहरातील शाळा प्रमुख व जिल्हा उपप्रमुख संभाजीराव शिरसाट यांनी संबंधित सुनील मधुकर जगताप हा ब्लॅकमेलर, गुन्हेगारी पार्श्वभूमी व एजंट असल्याने त्याच्या तक्रारींची दखल घेऊ नये, असे निवेदन शासनास दिले होते.
त्यानुसार शिक्षण उपसंचालक पुणे यांनी परिपत्रक निर्गमित करून सुनील मधुकर जगताप यांच्या तक्रारीची दखल घेऊ नये व तक्रार अर्ज रद्द करुन दप्तरी जमा करण्याचे निर्देश सर्व कार्यालयास दिले आहेत.