न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘राजमाता’ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे बाशा शेख, गीता सोळुंके, अमित जोशी (सुरेश नाईक स्पेस पार्क चे मॅनेजर), शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘राजमाता’ जिजाऊ व स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन करण्यात आले. एन्जल परिहार, पूनम पौड, स्वराली शिंदे, अर्पिता तिवारी, भावेश नखाते या विद्यार्थ्यांनी ‘राजमाता’ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या शौर्याबद्दल आपल्या भाषणातून माहिती सांगितली. सहशिक्षिका निशा पवार आणि देवर्षी नंदी मॅडम यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले.
‘राजमाता’ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका उर्मिला ठोंबरे यांनी केले व इयत्ता आठवीच्या श्रावणी सोळुंके या विद्यार्थिनीने आभार मानले.