न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२३) :- विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी, दरवर्षीप्रमाणे राज्य शासन विज्ञान प्रदर्शन तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर भरविण्यात येत आहे. यावर्षी शहरात सिटी प्राइड स्कूल चिखली-मोशी येथे १३ ते १४ जानेवारी दरम्यान, विज्ञान उत्सव रंगणार आहे.
पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग पिंपरी, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ, पिंपरी चिंचवड विज्ञान अध्यापक संघ तसेच सिटी प्राइड स्कूल, मोशी यांच्या वतीने सिटी प्राइड स्कूल, चिखली मोशी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पन्नासावे विज्ञान प्रदर्शन होणार आहे.















