न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२३) :- तुझ्या घरच्यांनी लग्न व्यवस्थीत लावुन दिले नाही. लग्नामध्ये आमचा मानपान निट केला नाही. तुझ्या वडिलांकडुन माझ्यासाठी सोन्याची चेन व अंगठी मागवुन घे, असे म्हणत सोन्याची चेन व अंगठीची फिर्यादीकडे मागणी केली. फिर्यादीने त्यांना नकार दिला.
आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच आरोपीचे दुस-या महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबधास फिर्यादीने विरोध केला. आरोपींनी फिर्यादीला घरातुन हाकलुन दिले. तसेच नांदविण्यास नकार देत फिर्यादीचा शारिरिक व मानसिक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १४/०५/२०२२) ते अद्यापपर्यंत आदर्शनगर, स्मशानभुमीजवळ, काळेवाडी, व फ्लॅट नं १११०, १० वा मजला, आदिनाथ सोसायटी, हडपसर येथे घडला. महिला फिर्यादी यांनी आरोपी मनिष गजानन शेलार (वय २७ वर्षे, धंदा नोकरी, रा. हडपसर, मुळपत्ता मु.पो लवेल, ता. खेड, जि. रत्नागिरी) याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















