न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२३) :- कार ट्रेलरने चाकण-तळेगाव रस्त्याने महिंद्रा कंपनीकडे फिर्यादी व त्यांचे मित्र (दि. १२) रोजी पहाटे १.४५ वा चे सुमारास जात होते. दरम्यान मनोहरनगरच्या कमानीजवळ नंबरप्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा मोटर सायकलवर आरोपी आले.
त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राचा कंटेनर थांबवला. त्यांना हाताने व लाथाबक्यांनी मारहान केली. हातात गज घेवन जिवे मारण्याची धमकी देत फिर्यादी व त्यांच्या मित्राच्या खिशातील मोबाईल, रोख रक्कम, ब्यू टूथ, स्पिकर असे एकून ३५,५०० रूपये किंमतीचा माल जबरदस्तीने घेवन पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी संजीत श्रीकाली ठाकुर (वय २५ वर्षे रा. सोमाटणे टोलनाका, ता. मावळ, पुणे, मुळ रा. ग्राम गरियो पो गरियो जि. हजारीबाग थाना बरी, झारंखड) यांनी आरोपी हेमत उर्फ पियुश बाळु धोत्रे (वय २१ वर्षे रा सिध्दार्थनगर तळेगाव स्टेशन), अनिकेत दादाभाउ धायबर (वय २२ वर्षे रा अंबिका पार्क, वतनगर, मावळ), सुमित राकेष गलीयल (वय २० वर्षे रा. सिध्दार्थ नगर तळेगाव स्टेशन) यांच्या विरोधात तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसानी आरोपींना अटक केली आहे.
















