न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२२) :- लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध आरोपींनी जाणूनबुजून फिर्यादी व त्यांच्या घरच्यांपासुन लपवले. तसेच फिर्यादीकडे वारंवार १० लाख रुपयांची मागणी केली. ते देण्यास फिर्यादीने नकार दिला. फिर्यादीला व तिच्या वडिलांना आरोपींनी शिवीगाळ केली. फिर्यादीचा शारिरिक, मानसिक व आर्थिक छळ केला. आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांकडुन ५,५०,००० रुपये घेतले. त्या पैश्याने फिर्यादीला लग्नामध्ये १३ तोळयाचे सोन्याचे दागिणे स्त्रीधन म्हणुन केले. त्यापैकी ११.५ तोळयाचे सोन्याचे दागिणे त्यामध्ये एक मंगळसुत्र, राणि हार, दोन अंगठ्या व कानातील टॉप्स आरोपींनी फिर्यादीकडुन मागुन घेतले. ते सोन्याचे दागिणे फिर्यादीने देण्यास नकार देवुन सोन्याच्या दागिण्यांचा अपहार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना सप्टेंबर २०१८ ते अद्यापपर्यंत परीस कॉलनी नं ३, तापकीरनगर, काळेवाडी व डिएनएस विला, फ्लॅट नं ७०२, आर. की मार्ग, घाटकोपर वेस्ट, मुंबई येथे घडली.
या प्रकरणी महिला फिर्यादी यांनी आरोपी पती हेमंत रामदास कणसे (वय ३४ वर्षे धंदा नोकरी) सासरे रामदास महादेव कणसे (वय ६५ वर्षे), महिला आरोपी, दीर भरत रामदास कणसे (वय ३९ वर्षे सर्व राहणार डिएनएस विला, फ्लॅट नं ७०२, आर. व्ही मार्ग, घाटकोपर वेस्ट, मुंबई), यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















