न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२२) :- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलेला आरोपी महिलेने पैशांचे अमिष दाखवले. तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवुन घेतला. त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागविली.
महाळुंगे पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी (दि. १२) रोजी सायं. ५.०० वा. चे सुमारास गट नं ६११, आळंदी फाटा, मेन एमआयडीसी रोड, कुरूळी येथील हॉटेल रॉयलईनमधील रुम नं १०५ मध्ये कारवाई केली. पोलिसांनी महिला आरोपीला अटक केली आहे.