- उन्नति सोशल फाऊंडेशन व डॉ. ओंकार बाबेल ब्रहमचैतन्य आयुर्वेद क्लिनीकचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२३) :- उन्नति सोशल फाऊंडेशन व डॉ. ओंकार बाबेल ब्रहमचैतन्य आयुर्वेद क्लिनीक यांच्या वतीने पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांसाठी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या कार्यालयात मोफत महाआरोग्य आयुर्वेदीक तपासणी व उपचार शिबीराचे आज रविवारी (दि. १५) रोजी आयोजन करण्यात आले होते. शिबिरात परिसरातील आठशे नागरिक, महिला, मुले, जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.
यात ० – १६ वयोगटातील मुलांसाठी सुवर्ण बिंदु प्राशन, बधिरपणा / हाता पायाला मुंग्या येणे, प्रकृती परिक्षण, संधीवात, पोटाचे आजार, मणक्यांचे आजार, दमा / अस्थमा, मुळव्याध, त्वचाविकार, स्त्रियांचे आजार, अम्लपित्त, डोके दुखी, अर्धशिशी (माईग्रेन), सर्दी व खोकला, वारंवार शिंका येणे आदी आजारांची मोफत तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदशन करण्यात आले.
यावेळी उद्योजक तथा उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे, डॉ सुभाषचंद्र पवार, विलास जोशी, अनिल कुलकर्णी, सतिश पिंगळे, विवेकानंद लीगाडे, सुरेश कुंजीर, सागर बिरारी, सुभाष पाटील, रमेश चांडगे, सखाराम ढाकने,विष्णुपंत वटंगवार व उन्नति विठाई मोफत वाचनालय, ज्येष्ठ नागरिक संघाचे बहूसंख्य सदस्य उपस्थित होते.
कुंदाताई भिसे म्हणाल्या, ” समाजातील गरजू लोकांना उपचाराचे दर परवडत नसल्याने तसेच निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे म्ह्णून आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात तज्ञ डॉक्टरांचा सह्भाग विशेष उल्लेखनिय होता.‘‘या शिबिरात सामान्य आरोग्य, नेत्र रोग, नाक-कान-घसा, आयुर्वेद, दंत आरोग्य, त्वचारोग, आहार व पोषण अशा आजारांशी संबंधित समस्या आणि मोफत तपासण्या करून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला देण्यात आला. यात डॉ. ओंकार बाबेल ब्रहमचैतन्य आयुर्वेद क्लिनीकचे तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.”


















