न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- दोन दिवसांपुर्वी झालेल्या आरोपी साई शिंदे याच्या भावासोबतच्या बाचाबाचीचा राग मनात ठेवुन फिर्यादी व त्याचा मित्र क्रिश हे घरासमोर बसलेले असताना आरोपी तिथे आले. साई शिंदे याच्या भावाने पाठीमागुन येवुन अज्ञात वस्तुने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली. त्यामुळे फिर्यादीच्या डोक्यात आणि पाठीमागे जखम झाली. त्यानंतर आरोपींनी मिळून फिर्यादीला शिवीगाळी करीत लाथाबुक्कयाने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी फिर्यादीचा मित्र क्रिश कुडीतकर हा फिर्यादीला वाचवण्यासाठी मध्ये पडला असता त्याला देखिल त्या सर्वांनी शिवीगाळी करत लाथाबुक्क्याने मारहाण केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १४/०१/२०२३) रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास बल्लाळेश्वर हौसींग सोसायटी, रुपीनगर येथे घडला.
फिर्यादी ओकांर अरुण थोपटे (वय १७ वर्षे, धंदा शिक्षण रा. बल्लाळेश्वर हौसींग सोसायटी, रुपीनगर) याने आरोपी साई शिंदे, साई शिंदे याचा भाऊ (नाव माहित नाही), अमन शेख, अथर्व गायकवाड (पुर्ण नांव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.