न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- पुण्यात शनिवारी (दि. १४) ते बुधवार (दि. १८) या कालावधीत जी-२० परिषद बैठक होत आहे. त्यामुळे जड वाहतुकीमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठ चौकाकडे येणाऱ्या जड वाहतुकीस शनिवारी (दि.१४) पासून बुधवार (दि. १८) मध्यरात्री १२ पर्यंत प्रतिबंध केला आहे. चांदणी चौक पाषाण मार्गे पुणे विद्यापीठाकडे, सुसरोड-पाषाण मार्गे पुणे विद्यापीठाकडे, मुंबई- बंगळुरू हायवेवरील राधा चौक बालेवाडी बाणेरमार्गे पुणे विद्यापीठाकडे, वाकड तळवडे रावेतकडून राजीव गांधी पूल औध मार्गे पुणे विद्यापीठाकडे या मार्गावरून अवजड वाहनांना प्रवेश बंद आहे.
जड, अवजड वाहनचालक जुना मुंबई -पुणे महामार्गावरील सेंट्रल चौकातून निगडी भक्ती-शक्ती चौक- खडकी मार्गे पुणे शहराकडे जातील. वाहनचालक पुणे-बंगळुरू हायवे कात्रज मार्गे इच्छितस्थळी जातील.