न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- पुणे जिल्हा नियोजन समितीची कार्यकारिणी मंगळवारी (दि. १७) रोजी जाहीर झाली. यात पिंपरी चिंचवड शहरातून भोसरीचे विजय फुगे, काळेवाडीतील काळुराम नढे यांची वर्णी लागली आहे.
पुणे जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्य अशी मिळून एकूण २० सदस्यांची यादी मंगळवारी (दि. १७) रोजी जाहीर करण्यात आली. या नवनियुक्त २० सदस्यांमध्ये विधानसभा किंवा विधानपरिषद किंवा संसद सदस्यांमधून निवडण्यात येणाऱ्या दोन, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या ४ असे एकूण ६ नामनिर्देशित तर अन्य १४ विशेष निमंत्रित सदस्य आहेत.
नामनिर्देशित ६ सदस्य
आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बीडकर
विशेष निमंत्रित १४ सदस्य
भगवान पोखरकर (वराळे, ता. खेड), माजी मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे (तळेगाव दाभाडे, ता. मावळ), वासुदेव काळे ((दौंड), आशा बुचके (पारुंडे, ता. जुन्नर), राहुल बाबूराव पाचर्णे (बाबुरावनगर, ता. शिरूर), जीवन कोंडे (केळवडे, ता. भोर), पांडुरंग कचरे (काटेवाडी, ता. बारामती), विजय फुगे (भोसरी, ता. हवेली), काळुराम नढे (काळेवाडी, ता. हवेली), प्रवीण काळभोर (कदमवाकवस्ती, ता. हवेली), योगेश टिळेकर (कोंढवा बुद्रूक, पुणे शहर), शरद हुलावळे (कार्ला, ता. मावळ), अलंकार कांचन (उरुळीकांचन, ता. हवेली) आणि अमोल पांगारे (वेळू, ता. भोर) यांचा समावेश आहे.