न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२३) :- जाधववाडी येथील गणेश प्लाझा राहत्या घरातून स्वीफ्ट कारमधून फिर्यादी यांनी पत्नीस सेंट्रल मॉल, शिवरस्ता येथे कामावर सोडले. त्यांची पत्नी सरला दिगंबर पाखरे या तिथून पायी चालत कामाच्या ठिकाणी गेल्या. त्यावेळी १० ग्रॅम वजनाचे ५३,००० रुपये किंमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र कोठेतरी पडले असल्याची त्यांना खात्री झाली. त्यांनी त्याबाबत त्यांच्या पतीला माहिती दिली. दोघा पती-पत्नीने मंगळसूत्र हरवल्याबाबतची तक्रार एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये दिली.
घटनेचे गांर्भीय लक्षात घेवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण व तपास पथक यांना मंगळसूत्राचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस शिपाई २८५२ भागवत शेप, पोलीस शिपाई २६४८ विशाल काळे यांनी फिर्यादी सोबत घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. स्वीफ्ट कार उभी केली होती, त्या ठिकाणी बाजूलाच १० ग्रॅम वजनाचे ५३,००० रुपये किंमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र आढळून आले. हे सोन्याचे मनी मंगळसूत्र परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या हस्ते पाखरे दाम्पत्याकडे सुर्पत करण्यात आले.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, मनोज लोहिया सह पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, विवेक पाटील पोलीस उपायुक्त, परिमंडळ-१, श्रीमती प्रेरणा कट्टे सहा. पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार राजेंद्र निकाळजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सचिन चव्हाण पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, भागवत शेप, विशाल काळे यांनी मिळून केली आहे.
















