न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२३) :- ट्रान्सफॉर्मरचे तपकिरी रंगाचे लोखंडी जुने वापरात नसलेले दोन पोल तसेच त्यामधील चॅनेल अशा एकूण वीस हजार रुपयांच्या वस्तू चोरटयाने कट करुन चोरून नेल्या होत्या.
ही घटना (दि. १७) रोजी सकाळी १०.०० वा ते सायं. ५.३० वा.चे दरम्यान भोंडवेवस्ती, राजयोग पेट्रोल पंपाच्या पुढे, रोड लगत, वाल्हेकरवाडी येथे घडली.
फिर्यादी कल्याण दिपचंद जाधव (वय ५० वर्ष, नोकरी (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड, चिंचवड शाखा क्रं ०२ सहाय्यक अभियंता) रा. फलॅट नं ए-४०२, एैश्वर्यम मेलोडी सोसायटी, सेक्टर ३२ ए, रावेत प्राधिकरण यांनी आरोपी विजु जॉर्ज मॉथु (वय ४९, धंदा इलेक्ट्रशियन, रा. पिंपरी, मुळगाव – त्रिपुरकोलम, ता. जि. ट्रोमट्रम, केरळ) याच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.