न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२३) :- महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी (एम.एच.१४ के.ए.०५७२) तून जर्शी गाय, कालवड, खोंड, दोन म्हशीचे टोणगे यांना क्रुरपणे रस्सीने बांधले. चारा पाण्याची कोणतीही सोय न करता तसेच कोणतीही हालचाल करता येणार नाही, अश्या प्रकारे गाडीमध्ये डांबून ठेवले. कोणत्याही प्रकारचा जनावरे वाहण्याचा परवाना तसेच पशुवैदयकिय अधिकारी यांचा परवाना अथवा दाखला नसतांना बेकायदेशीर वाहतुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
चाकण (महाळुंगे) पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी कारवाई करीत पाच लाखांच्या पिकअपसह १७,००० रुपये किमतीची जणावरे ताब्यात घेतली आहेत. ही कारवाई (दि. १७) रोजी दुपारी ३.३० वा. चाकण तळेगाव रोडवर बेलवाडी फाटा, खेड येथे केली.
ताज कुरेशी (रा. चाकण पुर्णनाव पत्ता माहित नाही), निलेश भरत कुचेकर (वय २९ वर्ष रा. महात्माफुले नगर चाकण), आकाश बाजीराव ससाणे (वय २५ वर्ष रा. महात्माफुले नगर चाकण), समाधान गोरख जाधव (वय २३ वर्ष रा. महात्माफुले नगर चाकण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.