- नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- चिंचवडमध्ये संभाजीनगर येथील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ शनिवारी (दि. २१) रोजी दुपारी ३.०० वाजता माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार आहे.
नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलमधे शनिवार रोजी दुपारी १ ते २.३० या वेळेत ही चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेनंतर दुपारी ३.०० वाजता माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षिस वितरण होईल. यावेळी नॉव्हेल ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांच्यासह प्राचार्य, शिक्षक आणि पालक उपस्थित राहणार आहेत.
चित्रकला स्पर्धेसाठी जी- २० जागतिक विश्वगुरु बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, आझादी का अमृत महोत्सव, सर्जिकल स्ट्राईक, कोरोना लसीकरणमध्ये भारत नंबर १, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आतरराष्ट्रीय योगदिन, बेटी बचाव बेटी पढाव, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिलास्थळ आदी विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत.