न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२३) :- मोटार खरेदीसाठी आरोपी (मो.नं.८८०५३११५०२) दुकानात समक्ष आला. त्याला फिर्यादी यांनी मोटारीचे कोटेशन दिले. त्यावर एवढी महाग मोटार असते का? असे म्हणत आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. फिर्यादीचा कामगार यश हावळे यास मारहाण केली. फिर्यादीच्या दुकानात आरोपीचे आणखी ५-६ साथीदार आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या कामगारास हाताने, पायाने व लोखंडी रॉडने मारहाण केली. लोकांची गर्दी जमल्याने आरोपी आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणाहून पळून गेले. मारहाणीत फिर्यादीच्या कपाळाला, डाव्या हाताच्या पंजाला तसेच डाव्या पायाच्या मांडीला मुक्का मार लागला असून कामगार यश हावळे याचा शर्ट फाटला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २०) रोजी सायं. ४/४५ वा. चे सुमारास श्रीसाई बोअरवेल, ढमाले वस्ती, नेरे येथे घडली.
फिर्यादी महेश अरुण जोगदंड (वय १९ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. आनंद पार्क, लेन नंबर १, गणेश मंदिराजवळ, थेरगांव) यांनी आरोपी मो.नं.८८०५३११५०२ वरील समक्ष हजर असणारा इसम (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) व त्याच्यासोबत आणखीण ५ ते ६ इसम यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.