न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२३) :- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावरुन जाताना (दि. १०) रोजी सकाळी ०७.३० वा. सुमारास ज्युपीटर मोपेडवरील (एमएच १४ एचवाय २५४५) दुचाकीस्वाराने हयगयीने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत दुचाकी भरधाव वेगाने चालविली.
त्यामुळे गाडी स्लीप होवुन दुचाकीचालक खाली पडला. अपघातात खांदयाला फ्रैक्चर होवुन, डोक्याला गंभीर मार लागला. अपघातातच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अतुल शांतीलाल शहा (वय ५८ वर्षे रा. रोझ ऑयकॉन, पिंपळे सौदागर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.