न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२३) :- नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२६ वी जयंती खराळवाडीतील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज सोमवारी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. महिला अध्यक्षा कविता आल्हाट तसेच मुख्य संघटक अरूण बोऱ्हाडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यावेळी ” नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा प्रखर राष्ट्रनिष्ठ बाणा आणि स्वाभिमानी भारताची संकल्पना हे गुण तरूणांनी अंगिकारले पाहिजे. नेताजी सुभाष हे तरुणांचे स्फूर्तिस्थान आहे. स्वतः उच्चशिक्षित असूनही अत्यंत कमी वयात त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली. देश पारतंत्र्याच्या शृंखलांतून मुक्त करण्यासाठी जगाला अचंबित करणारी गरूड भरारी त्यांनी मारली होती. आझाद हिंद सेनेची निर्मिती करून ब्रिटीशांना त्यांनी हादरा दिला होता. आझाद हिंद सेनेमध्ये कॅप्टन लक्ष्मी सेहेगल यांच्या नेतृत्वाखाली महिलांची फौज उभी करून त्यांनी महिलांच्या कर्तृत्वावर विश्वास प्रकट केला होता, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य संघटक, माजी नगरसेवक अरूण बोऱ्हाडे यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी महिला कार्याध्यक्षा कविता खराडे, चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगिता कोकणे, अर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रय जगताप, सरचिटणीस राजेश हरगुडे, महिला मुख्य संघटीका मीरा कदम, उपाध्यक्ष पुनम वाघ, पर्यावरण सेल अध्यक्ष विनय शिंदे, पर्यावरण अध्यक्ष ज्योती जाधव, संजिवणी पुराणिक, उपाध्यक्ष विजय दळवी, अर्चना जाधव, सुनिल कुवर, महेंद्र शितोळे, विक्रम पवार, सुनिल अडागळे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.