न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२३) :- कोणताही परवाना नसताना आरोपी हे पिकअपमध्ये भरलेला गॅस एलपीजी विड्रवल मशिनच्या साधनाचा वापर करून रिकाम्या गॅस सिलेंडर टाक्यामध्ये भरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
चाकण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तिघांना ताब्यात घेतले. ज्वालाग्राही पदार्थाबाबत कोणतीही काळजी आरोपींनी घेतली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. घरगुती गॅस या जिवनावश्यक वस्तुबाबत शासन व ग्राहकाची आरोपींनी संगणमताने फसवणुक केली.
हा प्रकार (दि. २१) रोजी पहाटे ००.२५ वा. चे सुमारास कुक्कूटपालनच्या शेडमध्ये, काळस रोड, गणेश मंदीर, तुकाईनगर, ता. खेड, पुणे येथे घडला. तुकाराम लक्ष्मण आढाव (वय ४० वर्षे, रा.मु.पो. भोसे ता.खेड जि.पुणे), मंचन सुभाष शिंदे (वय २४ वर्षे रा. रासे ता. खेड), जयसिंग परशुराम गांदेकर (वय ४९ वर्षे, रा. भोसे, ता. खेड जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.