न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२३) :- लहान मुलांसोबत सोसायटीच्या बाहेर फिर्यादी यांचा मुलगा खेळत होता. अज्ञात आरोपीने निष्काळजीपणे, रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने दुचाकी चालवली.
फिर्यादीच्या मुलाला धडक देवुन गंभीर जखमी केले. आरोपी दुचाकीचाल घटनास्थळी न थांबता निघून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. २२) रोजी रात्री ९.०० वा. च्या सुमारास जावेद शेख यांच्या ऑफिस समोर, विठ्ठल हेरिटेजजवळ, आकुर्डी येथे घडला.
३८ वर्षीय महीला फिर्यादीने आरोपी अज्ञात दुचाकीचालकाच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.