न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२३) :- मोबाईल व्हाटस अॅपवर (४९१५२२३६७९३५३) या नंबरवरुन एस.एम.एस. आला. त्यामध्ये डिव्हाईन काऊज अॅपच्या शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात माहिती होती. फिर्यादी यांनी ट्रेडिंग अॅपमध्ये ११,९९,००० रुपये गुंतवणूक केली होती.
ट्रेडिंग अॅपमध्ये फिर्यादी यांनी पैसे गुंतवणूक केले होते. त्यांना फायदा झाला होता. त्या सर्व डिटेल्स अॅपमध्ये दिसत होत्या. परंतु, डिव्हाईन काऊज अॅपमधून सर्व माहिती डिलीट झाली. त्यामध्ये काहीच बॅलन्स दाखवत नव्हते. अज्ञात इसमाने ट्रेडिंग अॅपद्वारे फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २८/०३/२०२२ ते २६/०७/२०२२ पर्यंत) डिव्हाईन काऊन अॅपवर घडली. फिर्यादी आशीर्वाद मुकुंद उगे (वय ३८ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, रा. ब्लुमिंग डेल, फ्लॅट नं. बी/१०३, रावेत) यांनी अज्ञात आरोपीविरोधात रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.