न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२३) :- आकुर्डीतील मस्जीद मागील रस्त्यावर विधीसंघर्षग्रस्त १७ वर्षीय मुलाने लोखंडी कोयता जवळ बाळगला असल्याची माहिती निगडी पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली.
पोलिसांनी (दि. २३) रोजी सायंकाळी ५:२५ वा. सुमारास कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला सीआरपीसी ४१ (१) (अ) प्रमाणे पोलिसांनी नोटीस दिली आहे.