न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च) :- जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. एकूण ७ टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडले, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले.
१७ व्या लोकसभेसाठी देशातील २९ राज्यांमध्ये ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल २३ मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला ११ एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघासाठीच्या निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी केली.
त्यामुळे, दिल्लीत असणारे नेते आता गल्लीकडे वळणार आहेत. तर, आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी विद्यमान खासदार आणि उच्छुक उमेदवारांची कसरत पाहायला मिळणार आहे.
मतदानाच्या ताऱखा आणि कंसात मतदारसंघाची नावे पुढील प्रमाणे आहेत :-
पहिला टप्पा- ११ एप्रिलला ७ जागांसाठी मतदान होणार आहे.
(मतदारसंघांची नावे – वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर आणि यवतमाळ- वाशिम)
दुसरा टप्पा – १८ एप्रिलला १० जागांसाठी मतदान होणार आहे.
(मतदारसंघांची नावे – बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर)
तिसरा टप्पा – २३ एप्रिलला १४ जागांसाठी मतदान होणार आहे.
(जळगांव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदु्र्ग, कोल्हापूर, हातकणंगले)
चौथा टप्पा – २९ एप्रिलला १७ जागांसाठी मतदान होणार आहे.
(मतदारसंघांची नावे – नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर, शिर्डी)