- उन्नती फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांचे प्रतिपादन..
- पिंपळे सौदागर येथील विठाई वाचनालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२३) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी देशाला संविधान दिले. संविधानामुळेच सामान्य माणसाच्या जीवनाला महत्व प्राप्त झाले. आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्वानी संविधानाच्या मुलतत्वांचे पालन केले पाहिजे. त्यामुळेच भारताला महासत्ता बनण्यासाठी मोलाचे योगदान ठरेल, असे प्रतिपादन उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी केले.
उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने आज पिंपळे सौदागर येथील विठाई वाचनालयाच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन घेण्यात आले. यावेळी अध्यक्षा कुंदाताई भिसे, सामाजिक कार्यकर्ते संजय आबा भिसे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवून सामुदायिक सलामी देण्यात आली. यावेळी वाल्मिक काटे ,दिपक गांगुर्डे ,राजेंद्र जसवाल ,समीर देवरे ,राजू देवतारे डॉ सुभाषचंद्र पवार व परिसरातील इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.
कुंदाताई भिसे म्हणाल्या, प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या प्रगतीचा संकल्प करावा. सामाजिक बांधिलकी म्हणुन पाणी, विज, इंधन व ऊर्जेचा वापर काटकसरीने करावा. प्रत्येकाने किमान ५ वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करावे. रस्त्यावर थुंकणे, कचरा मुक्या प्राण्यांबद्दल दया बाळगावी. कच-याचे वर्गीकरण व कंपोस्टींग करुन परसबाग सुशोभित कराव्यात. अस्वच्छता पाहून आपल्या देशाची प्रतिमा मलिन होते. आपल्या देशाची प्रतिमा उंचावणे हीच करी देशसेवा आहे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

















