न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२३) :- काळेवाडी येथील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे सचिव मल्हारीशेठ तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत सकाळी ८:३० वा. माजी सैनिक कॅप्टन सुरेश आदक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध नेत्रतज्ञ राहुल गायकवाड, पिंपरी चिंचवड केमिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष संतोष खिंवसरा, राजाराम तापकीर, मोहन तापकीर, शशिकांत तापकीर, चंद्रकांत तापकीर, सोमनाथ तापकीर, विवेक तापकीर, मनोज शिंदे, जगदीश निकम, शरद गुरव आदी उपस्थित होते.
इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली. सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार व साहित्य कवायत केले. ढोल ताशाच्या तालावर अप्रतिम लेझीम नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य व कसरती सादर करून शहिदांच्या स्मृतीस अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या चित्तथरारक कसरतीने उपस्थितांची वाहवा मिळवली. सुप्रिया पुंड, श्रुतिका नवसरे, दुर्वा गोरगेल, पूर्वेश क्षीरसागर, अतुल कांबळे, हर्षदा पुंड या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. गायत्री ढेपे या विद्यार्थ्यांनीच्या पेटीवादनासह डहाके मॅडम, सुप्रिया खताळ, पूनम इथापे साक्षी बावसकर, गायन केले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या प्र.मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री पवार यांच्या अधिपत्याखाली उल्का जगदाळे, रवींद्र बामगुडे, इतर शिक्षक/शिक्षकेतर यांनी केले. पूजा क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. तर पूनम कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संस्थेने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.