- पालिकेकडून सुरक्षा पथकाची नियुक्ती; दंडात्मक कारवाईचे अधिकार नाहीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत नदी, नाल्यालगत अनाधिकृतपणे भराव टाकला जातो. त्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या सारथी वेब पोर्टलवर तक्रारींचे निराकरण करण्याकरीता नदी-नाले सुरक्षापथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
अनाधिकृतपणे भराव व राडारोडा टाकणारे वाहन जप्त करून ते मोशी येथील बांधकाम राडारोडा प्रकल्प येथे जमा करण्याची कारवाई या पथकामार्फत करण्यात येते. त्या व्यतिरीक्त या पथकाला कोणतेही दंडात्मक कारवाईचे अधिकार नाहीत.
या पथकामार्फत काही अनुचित गैरवर्तन होत असल्याचे अढळल्यास पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडे संपर्क करावा, असे आवाहन नागरिक, बांधकाम व्यवसायिक, ठेकेदार, उद्योजक, कारखानदारांना महापालिकेने केले आहे.