न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२३) :- प्राधिकरण येथील गरवी गुजराती समाजाच्या वतीने ७४ वा प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन ज्येष्ठ नागरिक अण्णा अभंग यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, माजी महापौर आर.एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, शर्मिला बाबर, राजू बाबर, अशोक तनपुरे, तुकाराम काळभोर, मुन्ना बेग, नूर सय्यद, माऊली सोनटक्के, नरेंद्र येळकर, जयश्री मकवाणा, जिग्नेश पटेल, अल्पेश हिरानी, नयन तन्ना, एल.जी. पटेल, प्रतिक गरड, राजेंद्र बाबर, नितेश पवार आदी उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मौलाना आझाद स्पोर्टस क्लबच्या वतीने ७४ वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहन ज्येष्ठ नागरिक एल.जी. पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे अध्यक्ष खलील शेख, नरेंद्र येळकर, विजय शिनकर, मेहबूब सय्यद, सुधाकर जगताप, कवीर पवळे, आदी उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.